Srimad Bhagawad Gita Sarth In Marathi | भगवद गीता मराठी PDF

Language: Marathi, Sanskrit
Publisher: Geeta Pess of Gorakhpur
Year of Publication: Not mentioned
File Size: 5.8MB
Total Pages: 225
Author: Vedavyasa (Traditional)
Editor: Keshav Bhikaji Dhabale (केशव भिकाजी दबळे)
Translator: Nagesh Basudev Gunaji (नागेश बासुदेव गुणाजी)
Printer: Not specified
Place of Printing: Belgaum (विजयनगर, बेळगांव)
Edition: First Edition / Not specified
ISBN: Not available
Format: PDF
Source: Internet Archive
Category: Spiritual, Religious, Marathi Literature
Rights: Open Source / Free to Download
मराठी भाषेत गीतेचे पद्यानुवाद आणि सार्थ अर्थ वाचकांसमोर ठेवणारे हे पुस्तक जिज्ञासूंना भगवद्गीतेचा अर्थ समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरते।
फलश्रुति
आता ‘श्रवण केलियानें प्राप्त। काय आहे’ हे गीतेच्या शब्दांत सांगतो. गीतेच्या शेवटी (अ. १८. ६८-७१) भगवंतांनी असे सांगितले आहे की, जो कोणी हे माझे श्रेष्ठ गुह्य ज्ञान माझ्या भक्तांना सांगेल तो माझी परम भक्ती करून मलाच निःसंशय पावेल. त्याहून अधिक प्रिय करणारा सर्व मनुष्यांमध्ये दुसरा कोणीही नाही आणि त्याहून अधिक आमठता ह्या पृथ्वीवर दुसरा कोणी होणार नाही. जो कोणी आमच्या धर्मानुकूल संवादाचे अध्ययन करीत त्याने ज्ञानयज्ञाने माझे पूजन केल्यासारखे होईल असे मी मानीन आणि श्रद्धायुक्त व निर्मत्सर होउन जो कोणी हे ऐकेल तोही मुक्त होऊन पुष्पवानांच्या उत्तम लोकांप्रत पावेल।
ही गीतेची अल्प सेवा व गीतेचे अध्ययन करण्याचा मुयोग केशय भिकाजी दबळे ह्यांनी पुनः घडवून आणल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानून, सर्वांच्या अंतर्यामी बास करणाऱ्या व सर्वोच्या बुद्धीला प्रेरणा देणाऱ्या त्या श्रीकृष्ण परमात्म्याचे चिंतन व हे कार्य संकल्याप्रमाणे तडीस नेल्याबद्दल सादर व सप्रेम स्मरण करून त्यांनाच ही ‘पत्र पुष्यं फलं तोयं’ अशी अन्य कृती अनन्य व निष्काम भक्तीने समर्पण करून अशीच सेवा उत्तरोत्तर आमच्याकडून करवून घ्याची असा त्या दयाधन प्रभूपाशी प्रसाद मागून ही प्रस्तावना पुरी करतो।
॥ ॐ तत्सत् ।

